रत्नागिरी : दिनांक २७ व २८ सप्टेंबर रोजी स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात पुरूषोत्तम करंडक रत्नागिरी विभागाची फेरी अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत पार पडली. यात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या '' एकांकिकेने द्वितीय क्रमांकाच्या करंडकाचा मान पटकावला. शिवाय सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य पुरस्कार गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा शुभम गोविलकर तसेच सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची आर्या वंडकर हिने मिळवला.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
संघाचे मार्गदर्शक म्हणून गणेश राऊत यांनी मदत केली , तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १० महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. सादर झालेल्या एकांकिकांमधून ४ एकांकिकेचे संघ पुण्यात होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. यात अनुक्रमे डीबीजे महाविद्यालय चिपळूण, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, फिनोलेक्स महाविद्यालय, आणि स.ह. केळकर महाविद्यालय देवगड यांचा समावेश आहे. ह्या फेरीचे परीक्षण श्री विनयराज उपरकर, श्री प्रदिप तेंडुलकर आणि श्री गिरिश केमकर यांनी केले.
हा कार्यक्रम रत्नागिरी आकाशवाणीचे प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी महाराष्ट्रीय कलोपासकचे विश्वस्त प्रदिप पाटसकर, चिटणीस ठाकूरदेसाई तसेच, डॉ. संजय केतकर, ज्येष्ठ रंगकर्मी अनिल दांडेकर आदी उपस्थित होते.
सदर याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन , कार्यवाह श्री सतीश शेवडे, प्रभारी प्राचार्य डॉ प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ मकरंद साखळकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी,विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले आहे.