रत्नागिरी :- रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांची नांदेड येथील वाघाला महानगरपालिका येथे मनपा आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

डॉ.पाटील यांच्या ठिकाणी पुणे येथील एमएससीईआरटीचे संचालक देवेंद्र सिंग यांची रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत तर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच पुजारी यांची नियुक्ती झाली आहे. गुरुवारी रात्री उशीरा राज्य सरकारने राज्यातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली.