भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव दिवटे 

पालम 

पालम शहरापासून जवळच असणारे पेठ शिवणी येथे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा स्थापन करण्यासंदर्भात भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव नारायणराव दुधाटे यांनी मा.भागवत कराड साहेब अर्थ राज्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांना दिनांक 16/08/2021 रोजी पत्र दिले होते त्यानंतर त्यांना दि.12/10/2021 रोजी पत्र क्रमांक 618 पत्र मिळाले तरीपण आतापर्यंत या संदर्भात कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे हा प्रश्न निकाली निघाला नाही

त्यामुळे शिवाजीराव दिवटे यांनी माननीय भागवत जी कराड साहेब अर्थ राज्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांना दिनांक 29/09/2022 रोजी पत्र पाठवून पेठ शिवणी येथे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा तात्काळ स्थापन करण्यात यावी अशी मागणी दिवटे यांनी केली आहे सदरील प्रश्न निकाली काढून पेठ शिवणी येथील जनतेला होत असलेल्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवटे यांच्याकडून होत आहेत