मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार - कॉ.आडम मास्तर यांची घोषणा

हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची ११ वे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न !

सोलापूर :- सोलापूराला कामगार लढ्याची परंपरा आहे.यात लढाऊ महिलांनी हक्काच्या घरांसाठी अविरत आणि आक्रमक संघर्ष केले.देशाच्या सत्ताधीशांना दखल घ्यावी लागली. विडी कामगारांना दहा हजार घरकुल मिळाल्यानंतर 30 हजार असंघटीत कामगारांनी ही घरासाठी वाट्टेल ती लढाईच्या पवित्र्यात उतरले आणि संघर्षाची तयारी केली म्हणून पंतप्रधान आवास योजना अंतर्गत रे नगर च्या माध्यमातून घरे उपलब्ध झाली.या महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पातुन वितरित होणाऱ्या घरांच्या पायाभूत सुविधांचा शुभारंभ करण्यासाठी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांना सस्नेह निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारले याकरीता यांच्या स्वागतासाठी हक्काच्या घरांसाठी 25 हजार लढाऊ कष्टकरी महिला उपस्थित राहतील असा निर्धार संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले. 

हुतात्मा कुर्बान हुसेन आल्पसंख्याक महिला कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने गुरुवार दि. २९ सप्टेंबर २०२२ रोजी हुतात्मा स्मृती मंदीर येथे संस्थेचे चेअरमन नलिनीताई कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची ११ वे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. 

ते पुढे बोलतांना आडम म्हणाले, पायाभूत सुविधांबाबत म्हाडा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र वीज मंडळ यांना महाराष्ट्र निवारा फंडातून ३०० कोटींची तरतूद राज्य शासनाने केली आहे. मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे व मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना समक्ष भेटून प्रकल्पाची अद्यावत माहिती व सद्यस्थिती बाबत सांगितले असता मा.मुख्यमंत्री यांनी मी स्वतः आणि देवेंद्रजी फडणवीस हे रे नगरच्या पायाभूत सुविधांचा शुभारंभ करण्यासाठी येणार असल्याचे आश्वासित केले.  

भोपाळच्या धर्तीवर राष्ट्रीयकृत बँकातून ६.५ टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासंबंधी राज्य सरकारकडे शिफारस पाठवण्यात आले. यामुळे साधारणतः एका लाभार्थ्यांचे 2 लाख 40 हजार रुपये असे 30 हजार असंघटीत कामगारांचे ७४० कोटींची बचत होण्यास मदत होणार आहे. 

ते पुढे म्हणाले कि, 2002 साली उसळलेल्या गुजरात दंगलीतल्या सर्वांत भयंकर घटनेपैकी एक म्हणजे बिल्किस बानो यांचे प्रकरण. या दंगलीतली सर्वांत मोठी पीडित पुरावा आणि या दंगलीत पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या 18-19 वर्षांच्या बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला तिच्या डोळ्यांदेखत जमिनीवर आपटून हत्या करण्यात आली. तिची आई, दोन दिवसांची बाळांतीण असलेली तिची बहिण यांच्यासह तिच्या 14 नातलगांना संतप्त जमावाने ठार केले 

या घटनेने बिल्किस आणि तिचे पती याकून दोघांचही आयुष्य नेहमीसाठी बदलले. गेली 17 वर्षं जीवाच्या भीतीने त्यांना वणवण भटकावे लागले. ओळख लपवून रहावे लागले. वीसहून जास्त घरे बदलावी लागली. एकप्रकारे विस्थापिताचे जीणे वाट्याला आले. या घटनेची आठवण करत आक्रोश व्यक्त केले. 

वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. 

 या प्रसंगी व्यासपीठावर अजीजा शेख, तस्लीमा मुल्ला, रुबीना ईनामदार, मुमताज दाऊद शेख आदींची उपस्थिती होती.

सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख, मा.नगरसेविका कामिनीताई आडम यांनी सभेला मार्गदर्शन केले.   

कॉ. युसूफ (मेजर) शेख यांनी प्रास्ताविक केले. तर संस्थेचे लेखापाल कॉ. गजेंद्र दंडी यांनी वर्षी जमा-खर्चाचा लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केले व त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेने एकमताने मंजूरी दिली. या सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ. शाम आडम यांनी केले.

सदर वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी दाऊद शेख, नरेश दुगाने,दिपक निकंबे, शबीना शेख, अमीना शेख, राजेश काशीद, इब्राहीम मुल्ला, बजरंग गायकवाड, रतीक नदाफ, हुसेन शेख,युसूफ (कालू) शेख, जावीद सगरी, जुबेर सगरी, नितीन गुंजे, नितीन कोळेकर, सिद्राम गायकवाड़, सुजित जाधव, बाळकृष्ण मल्याळ, फीरोज शेख, अमीन शेख, अस्लम शेख, अरबाज़ सगरी, हरीश पवार, फीरोज शेख, सलामन शेख, माजिद नदाफ, गंगाराम निंबाळकर, प्रशांत चौगुले, धनराज गायकवाड़, आदींनी परिश्रम घेतले.