हॉटेल चालकासह 13 जणांना 31 हजार पाचशे रुपयांचा दंड

हॉटेलवर दारू पिणे बेकायदेशीर असतांना सोलापूर -हैद्राबाद रोडवरील हॉटेल मातोश्री ढाबा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला असता हॉटेल च्या चालकासह 13 मद्यपीं अटक करण्यात आली. 

सविस्तर वृत्त असे की, 28 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवरील हॉटेल मातोश्री येथे धाड टाकली असता हॉटेल चालक नेताजी लिंबाजी जगताप रा. दहीटने ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर याचेसह त्याच्या हॉटेलमध्ये अवैध रित्या दारु पिण्याकरिता बसलेल्या 13 मद्यपींना अटक करुन ताब्यात घेतले. अटक आरोपींच्या ताब्यातून रू. 3055/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 व 84 नुसार गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी 24 तासात तपास पूर्ण करून गुरुवारी 29 सप्टेंबर रोजी गुन्ह्याचे आरोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले असता मा. न्यायालयाने तात्काळ निकाल देत हॉटेलचालक यास रू. 25,000/- व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रू. 500/- प्रमाणे असा एकूण 31,500/- दंड ठोठावला आहे. 

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक व उप अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश आवताडे, उषा किरण मिसाळ व सहायक दुय्यम निरीक्षक बिराजदार, मुकेश चव्हाण, जवान शोएब बेगमपुरे, प्रियंका कुटे, चेतन व्हनगुंटी, प्रशांत इंगोले व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली असून सदर गुन्ह्याची फिर्याद चेतन व्हनगुंटी यांनी दिली असुन तपास पुष्पराज देशमुख दुय्यम निरीक्षक अ-2 विभाग, सोलापूर यांनी पूर्ण केला.

*आवाहन*

धाब्यावर दारू पिणे तसेच दारू पिण्याकरिता व्यवस्था उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा आहे, नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अवैध धाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारू पिताना आढळून आल्यास त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.