सोलापूर येथील रहिवाशी माजी महापौर मनोहर गणपत सपाटे यांनी महिलेवर अनेक वर्षापासून अत्याचार केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात अतिसत्र श्रीमती के . जी . शिरमाते सो.यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला .
थोडक्यात हकीकत अशी की , पीडीत महिलेवर मनोहर सपाटे यांनी शारिरिक संबंध ठेवले . तिने विरोध केल्यानंतर तुला कामावरून काढून टाकीन ,तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करीन असे धमकावत तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केला.शिवाय तिने याबाबत एकदा विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाणे गाठल्यानंतर तिच्यावर दबाव आणून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते . तिची इच्छा नसतांनाही तिचा राजीनामा घेतला.निवृत्तीचे पैसे देण्यासाठी १० लाख रूपये जबरदस्तीने घेतले अशा अशायाची फिर्याद पिडीतेने फौजदार चावडी पोलिसात दाखल केली होती.सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोहर सपाटे यांनी सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये ऍडवोकेट शशि कुलकर्णी यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता . सदर प्रकरणाची सुनावणी अति . सत्र न्यायाधिश श्रीमती के . डी . शिरमाते सो . यांची कोर्टासमोर झाली . सदरकामी मे वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून पोलिस स्टेशन येथे हजरी लावण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
सदरकामी आरोपीतर्फे ऍडवोकेट शशि कुलकर्णी, ऍडवोकेट गुरुदत्त बोरगांवकर,ऍडवोकेट देवदत्त बोरगांवकर,ऍडवोकेट विश्वास शिंदे , ऍडवोकेट बाबासाहेब सपाटे तर सरकारतर्फे तर मूळ फिर्यादीतर्फे ऍडवोकेट भडंगेयांनी यांनी काम पाहिले .