फलटण सहित रायगड जिल्ह्यांतून अभिनंदनाचा वर्षाव
आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला क्रिकेट खेळण्याला सुरूवात होऊन, आता ८० वर्षाहून जास्त काळ लोटला आहे. २००० नंतर, महिला क्रिकेटकडे लोकांचा काहीसा कल वाढू लागला. प्रत्येक देशातील दोन-चार महिला क्रिकेटपटू सोडल्या तर इतर महिला क्रिकेटपटूंविषयी कोणाला जास्त माहीती नव्हती. भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही मिताली राज, अंजुम चोप्रा, झुलन गोस्वामी अशी काही मोजकीच नावे पाठ होती. मात्र, २०१७ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेद्वारे क्रिकेटप्रेमींना अनेक प्रतिभावंत महिला क्रिकेटपटुंची ओळख झाली. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने केलेल्या चमकदार कामगिरीनंतर, भारतीय महिला क्रिकेटची एक संपूर्ण पिढीच प्रकाशझोतात आली.आता त्यामध्ये महाराष्ट्रातील छोट्याश्या गावातील कन्या हिने महाराष्ट्राच्या एकोणीस वर्षाखाली मुलीच्या संघात निवड झाली असून त्या कन्येचे नाव आहे सानिया दयानंद गावडे.
लहानगी सानिया ही टेलिव्हिजनवर क्रिकेट पाहत. ती क्रिकेट खेळू लागली. तिच्या कुटूंबियांना आपली मुलगी उत्तम क्रिकेट खेळते, हे पाहून कौतुक वाटत. लहानपणापासून क्रिकेटर व्हायचे सानिया गावडे हिचे स्वप्न होते.
सानिया दयानंद गावडे हिचे सद्यस्थितीत अठरा वर्ष असून ही सन २०१७ पासून क्रिकेटचे सराव करत आली आहे.
सानिया ही पुण्यामधील सुरुवातीला पीवायसी जिमखाना,एच के बाउन्स,लॉ कॉलेज रोड, विरांगणा क्रिकेट क्लब, वॉरियर्स क्रिकेट क्लब, आणि गॅरी क्रिस्टन क्रिकेट क्लब या पुण्यातील क्रिकेट अकॅडमी मधून सराव केले आहे.सानिया ही मागील काही वर्षापासून क्रिकेटच्या बऱ्याच सामन्यातुन
खेळली आहे. ती अप्पर ऑर्डर मध्ये बॅटिंग करत असून ती उत्कृष्ट विकेट किपर सुद्धा आहे .क्रिकेटच्या बऱ्याच सामन्यात तिने चांगल्या प्रकारचे धावा केल्या असून कीपिंग मधील सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. सध्या ती गॅरी क्रिस्टन अकॅडमी पुणे मधून मुलींच्या टीमची कॅप्टन म्हणून खेळत आहे.
सानिया हिने आतापर्यंत कै पवन कुलकर्णी, हेमंत किनीकर, राजेश माहूरकर,इंद्रजीत कामतेकर, मोहन जाधव,सुरेंद्र भावे,स्वप्नील मोडक आणि सतीश नायकवडी या क्रिकेटच्या प्रशिक्षक यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरविले आहेतआहेत.तिच्या आजपर्यंतच्या क्रिकेटमधील वाटचालीस या अनेकांचे मार्गदर्शन लाभले आहे...
सानिया ही क्रिकेटमध्ये करियर करीत असताना सुध्दा शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही आहे.सानिया ही मॉडर्न कॉलेज पुणे या ठिकाणी एफ वाय बी कॉम मध्ये शिकत आहे.
सातारा जिल्ह्यातील गुणवरे गावातील सुकन्या सानिया दयानंद गावडे हिची महाराष्ट्र राज्याच्या १९वर्षाखालील मुलींच्या संघात निवड झाली आहे.सानिया गावडे हिच्यावर फलटण सहित रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सानिया गावडे ही गुणवरे सोसायटीचे सभापती सदाशेठ गावडे यांची नात तर गणवरेच्या माजी सरपंच प्रविणा गावडे व रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांची द्वितीय कन्या आहे. .
सानिया गावडे हिची महाराष्ट्राच्या एकोणीस वर्षाखालील मुलींच्या संघात निवड झाल्याने गुणवरे गावसहित रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सानिया गावडे हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे हे समजताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,त्याचबरोबर पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाहित अनेकांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
सानिया हिने फक्त क्रिकेट खेळणे आणि त्या खेळामध्ये प्राविण्य मिळवणे हेच ध्येय ठेवून क्रिकेट खेळत असते त्यामुळे आम्ही पालकांनीही क्रिकेट हेच करिअर तिच्यासाठी निवडले असून त्या अनुषंगाने तिचे प्रयत्न चालू असून त्यासाठी संपूर्णपणे पाठिंबा देणे हेच आमचे कर्तव्य बनले आहे.:-दयानंद गावडे.सानिया गावडे हिचे पिता तथा पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण, शाखा रायगड.