शेतातून घरी परत येणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिचे अश्‍लिल फोटो काढून ते सोशलमिडियावर टाकण्याची धमकी देणार्‍या नराधम आरोपीला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षाची शिक्षा व दंड ठोठावला. सदरम्यान साक्षीदार या प्रकरणात फितूर झाले होते पण न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आरोपीला कठोर शिक्षा सुनावली. या गुन्ह्याची घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली होती.

.19-10-2020 रोजी पिडीत मुलगी तिच्या राहत्या घराच्या पाठीमागे शेतातील ओढ्यामधून परत येत असतांना आरोपी विशाल शरद शेळके याने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार करून तिचे अश्‍लिल फोटो काढत तिला मारहाण केली होती. त्याचबरोबर फोटो सोशलमिडियावर टाकण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध कलम 376(3), 323, 506 भादवी आणि कलम 3/4 ालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण आदी सन 2012 आणि कलम 37 () माहिती तंत्रज्ञान अधि-सन 2000 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. सदर फिर्यादीवरून तत्कालीन पोलीस निरीक्षक त्रिभूवन यांनी या प्रकरणाचा तपास केला. जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावणी न्यायाधिश एच.एस. महाजन यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. कोर्टातर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला. सदर प्रकरणात फिर्यादी व इतर साक्षीदार फितूर झाले होते परंतू सदर प्रकरणात सरकार पक्षाचे दाखल केलेले सक्षम पुराव्याचे व कागदपत्राचे अवलोकन करून सहाय्यक सरकारी वकील मंजुषा एम.दराडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच.एस. महाजन यांनी आरोपी विशाल शरद शेळके यास कलम 3, 4(1) पोक्सो कायद्यान्वये दोषी धरून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 20 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक सरकारी वकील एस. राख यांनी सहकार्य केले. तसेच त्यांना पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार इंगळे, पीएसआय जायभाये, पो.हे.कॉ. सानप, इंगोले व महिला पोलीस नाईक सी.एस. नागरगोजे यांनी सहकार्य केले.