*जनता न्यूज चॅनल प्रतिनिधी माबुद खान*

  जिंतूर तालुक्यातील खाजगी पशुधन पदवीधारक यांनी कोरोना काळ व लंपी स्किन रोग काळात शासनाकडून कोणताही पैसा न घेता सेवा दिली आहे त्यामुळे खाजगी कंत्राटदारामार्फत स्थानिक पशुधन पदवीधारक यांना नोकरीची संधी देण्यात यावी नसता लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा निवेदन परभणी वेटनरी अँड डेरी डिप्लोमा होल्डर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार ओमप्रकाश गौंड यांना दि. २९ सप्टेंबर रोजी देण्यात आले आहे.

 या निवेदनात नमूद करण्यात आले कि खाजगी पर्यवेक्षक पदविका धारक असून परभणी जिल्ह्यातीलच आहोत तसेच शासनाणे सिनर्जीज सोल्युशन कंपनीला' बाह्य स्त्रोत कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यास मान्यता दिली सिनर्जीज सोल्युशन या कंपनीने • आपल्या जिल्हातील पशुधन पर्यवेक्षक पदविका धारक यांचा विचार करावा नाही तर आम्हाला. ना इलाजास्त्व लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल तरी मां. जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षक पदविका धारक यांचा विचार करावा. व अंशकालीन सारखे सेवादाता यांना सरळ सेवेत १० % आरक्षण देण्यात यावे सेवादाता हे २०१७ ते २०२० यांनी अनेक वर्षा पासून पशु संवर्धन विभागातील कामे १) पशु गणना २) लसिकरण ३) गाय व, म्हैस वर्गातील जनावरांना टॅगिंग ४) जंत नाशक ५) खच्ची करण असे अनेक पशु संवर्धन विभागातील कामे सेवादाता करीत आहेत. विनंती तसेच सदर पदे अशा वतीने न भरण्या ऐवजी जाहिरात देऊनच सरळ सेवा भरती द्वारे भरण्यात यावे या निवेदनावर तालुका अध्यक्ष राजेश पंडित, प्रमोद घोडदे, कोंडीराम काळे, सुरेश काचगुंडे, जाधव गजानन, सोळंके विशाल, जवळे विठ्ठल,जवळे नारायण, चव्हाण परमेश्वर आदींच्या हस्तक्षरे आहे.