औरंगाबाद:रास्त भाव दुकानामार्फत पात्र शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-पॉस मशिनद्वारे अन्नधान्य वाटप करण्यात येते. ई-पॉस मशिनवर सर्व शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार सिडींग होणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांचे आधार सिडींग झालेले नाही, अशा शिधापत्रिकाधारकांसाठी जिल्हयातील रास्त भाव दुकानामार्फत 2 ऑक्टोबर रोजी विशेष शिबीराचे (कॅम्प) आयोजि करण्यात आलेले आहे. ज्या आधार लाभार्थ्यांचे सिडींग केलेले नाही अशा लाभार्थ्यांनी त्यांचे आधारकार्डची छायांकीत प्रत घेवून रास्त भाव दुकानदार यांचे मार्फत आधार सिडींग करुन घ्यावे. तसेच काही अपरिहार्य कारणास्तव काही शिधापत्रिकाधारकांचे 2 ऑक्टोबर रोजी कॅम्पद्वारे आधार सिडींग झाले नसल्यास त्यांनी दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत आधार सिडींग करुन घेण्यात यावे तसेच जे शिधापत्रिकाधारक 15 ऑक्टोबर पर्यंत आधार सिडींग करुन घेणार नाही, अशा शिधापत्रिकेवरील अन्नधान्य वाटपाबाबत प्रशासनाकडून गांभिर्याने नोंद घेवून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्याचे निधन झाले आहे अशा लाभार्थ्यांचे नांव वगळण्या करिता कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच मयत लाभार्थ्यांचे नांवे अन्नधान्य उचल करु नये असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.सद्यस्थितीत सेवा पंधरवाडा चालु असल्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांनी रास्त भाव दुकानदार यांचे मार्फत आधार सिडींग करुन घ्यावे व मयत लाभार्थ्यांचे नांवे मृत्यु प्रमाणापत्रासह कळविण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પ્રધાનમંત્રી નરેન્દ્રભાઈ મોદીના જન્મ દિવસની ઉજવણી ના ભાગરૂપે પખવાડિયા નું આયોજન કરવામાં આવ્યું
આદરણીય પ્રધાનમંત્રી નરેન્દ્રભાઈ મોદી ના જન્મ દિવસ ની ઉજવણી ના ભાગ રૂપે ગુજરાત ભાજપ દ્વારા સેવા...
ઝાલોદ તાલુકાનો જીવાદોરી સમાન માછણ ડેમ થયો ઓવરફ્લો.
દાહોદ જિલ્લામા વરસેલા વરસાદને પગલે જિલ્લાના ડેમ છલકાયા.
ઝાલોદ તાલુકાનો જીવાદોરી સમાન માછણ ડેમ...
મહુવા અરબ યુવા ગૃપ દ્વારા પ્રથમ સ્નેહ મિલન સાથે સમાજના તેજસ્વી તારલાઓનું સન્માન સમારોહ
ભાવનગર જિલ્લા મહુવાની અરબ સમાજની વાડી ખાતે મહુવા અરબ યુવા ગૃપ દ્વારા સમાજનું પ્રથમ સ્નેહ મિલન...
દારૂના જથ્થા સાથે ભૂરો પકડાયો...
દારૂ ન જથ્થા સાથે ભૂરો પકડાયો...
শালমৰা অঞ্চলত শিক্ষাৰ্থীৰ দুৰ্বল দলঙেৰে যাতায়ত
দুৰ্বল দলঙৰ যাতায়ত শিক্ষাৰ্থীৰ শালমৰা অঞ্চলত।