औरंगाबाद:रास्त भाव दुकानामार्फत पात्र शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-पॉस मशिनद्वारे अन्नधान्य वाटप करण्यात येते. ई-पॉस मशिनवर सर्व शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार सिडींग होणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांचे आधार सिडींग झालेले नाही, अशा शिधापत्रिकाधारकांसाठी जिल्हयातील रास्त भाव दुकानामार्फत 2 ऑक्टोबर रोजी विशेष शिबीराचे (कॅम्प) आयोजि करण्यात आलेले आहे. ज्या आधार लाभार्थ्‍यांचे सिडींग केलेले नाही अशा लाभार्थ्‍यांनी त्यांचे आधारकार्डची छायांकीत प्रत घेवून रास्त भाव दुकानदार यांचे मार्फत आधार सिडींग करुन घ्यावे. तसेच काही अपरिहार्य कारणास्तव काही शिधापत्रिकाधारकांचे 2 ऑक्टोबर रोजी कॅम्पद्वारे आधार सिडींग झाले नसल्यास त्यांनी दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत आधार सिडींग करुन घेण्यात यावे तसेच जे शिधापत्रिकाधारक 15 ऑक्टोबर पर्यंत आधार सिडींग करुन घेणार नाही, अशा शिधापत्रिकेवरील अन्नधान्य वाटपाबाबत प्रशासनाकडून गांभिर्याने नोंद घेवून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्याचे निधन झाले आहे अशा लाभार्थ्यांचे नांव वगळण्‍या करिता कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच मयत लाभार्थ्यांचे नांवे अन्नधान्य उचल करु नये असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.सद्यस्थितीत सेवा पंधरवाडा चालु असल्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांनी रास्त भाव दुकानदार यांचे मार्फत आधार सिडींग करुन घ्यावे व मयत लाभार्थ्यांचे नांवे मृत्यु प्रमाणापत्रासह कळविण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी केले आहे.