पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी निलंबन केले आहे .
शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये एका तक्रारदाराने फसवणुक झालेबाबत तक्रारीअर्ज दाखल केला होता. सदर तक्रारी अर्ज चौकशीकामी पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख, यांचेकडे प्रभारी अधिकारी शिक्रापुर पोलीस ठाणे यांनी दिलेला होता, परंतु सदर तक्रारी अर्जावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अर्जदार यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली होती. तसेच पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांनी पैशाची मागणी केली असल्याबाबत व्हिडीयो देखील दिला होता.
पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांनी संबंधित अर्ज चौकशी कामी संशयास्पद वर्तन करुन आर्थिक लाभाच्या प्राप्तीच्या हेतुने कोणत्याही समर्थनीय कारणाशिवाय अर्ज चौकशी प्रलंबित ठेवली असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आल्याने,तसेच अर्जदार यांना पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांनी पैशाची मागणी करुन शासकिय सेवकास अशोभनीय असे गैरवर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९७९ मधील नियम क्रमांक ३ चे उल्लंघन केले, तसेच शासकिय सेवेत दाखवलेल्या बेशिस्त, बेजबाबदार व पोलीस खात्याला अशोभनीय अश्या वर्तनाबद्दल त्यांचेविरूध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात आली आहे.
तर पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख, यांना शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्या अधीन राहुन सेवेतुन " निलंबित " करण्यात आले आहेत.
तसेच पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख, यांना निलंबन कालावधीत पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण यांचेकडे नियमानुसार सकाळ व संध्याकाळी असे दिवसातून दोनवेळी हजेरी लावणे देखील बंधनकारक असणार आहे.