चिपळूण : शहरात दोन ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या मुंबई पथकाने आज मोठी कारवाई केली आहे. या छापेमारीत जवळपास 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न औषध प्रशासनाने विमल, RMD, केसर सह अनेक प्रकारचा गुटखा जप्त केला. शिवाय गुटख्याच्या पॅकेट्स सह एक कार FDA च्या पथकाने ताब्यात घेतली आहे.
चिपळूण पोलीस स्थानकापासुन काही मिनिटाच्या अंतरावरच ही कारवाई करण्यात आली. शहरातील नुराणी कॉम्प्लेक्स येथे मुंबई पथकाने केलेल्या कारवाई नंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. चिपळूण पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मोठ्या कारवाईने चिपळूण शहरातील अनेक अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहेत.