यवतमाळ , राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्हयातील जगदंबा संस्थान केळापूर येथील विविध विकासकामांकरिता मंजूर ५ कोटी रू. निधी पैकी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत करण्यात आला आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री . सुधीर मुनगंटीवार यांनी जगदंबा संस्थानच्या भाविकांना नवरात्रोत्सवाची अनुपम भेट दिली आहे.यवतमाळ जिल्हयातील पांढरकवडा तालुक्यातील जगदंबा संस्थान केळापूर हे अतिशय जागृत देवस्थान आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सन २०१९-२० मध्ये या धार्मीक स्थळाच्या ठिकाणच्या विविध विकासकामांसाठी ५ कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र या विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी अप्राप्त होता. हा निधी उपलब्ध व्हावा यासाठी . सुधीर मुनगंटीवार यांनी तब्बल दोन वर्षे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. विधानसभेत संसदीय आयुधांच्या माध्यमातुन देखील हा मुद्दा त्यांनी रेटला. अखेर दिनांक २९ सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये जगदंबा संस्थान येथील विविध विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत करण्यात आला आहे. याठिकाणी भक्त निवास, फर्निचर, पाणी पुरवठा व स्वच्छता, आंतर व बाह्य विद्युतीकरण, अग्नीशमन व्यवस्था, अंतर्गत रस्ते बांधकाम, सिमेंटकॉंक्रीट नाली बांधकाम, वातानुकुलीकरण, आर.ओ. सिस्टीम, सिसिटिव्ही सिस्टीम, वृक्ष लागवड, ट्री गार्ड आदी व्यवस्थांचा अंतर्भाव आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પાટણ રવદ પાલીપુર કેનાલનું પાણી છોડવા બાબત ખેડૂતો દ્વારા લેખીત અરજી કરાઇ@live24newsgujarat
પાટણ રવદ પાલીપુર કેનાલનું પાણી છોડવા બાબત ખેડૂતો દ્વારા લેખીત અરજી કરાઇ@live24newsgujarat
আজিৰে পৰা গড়মূৰ কছাৰী ময়দানত অনুষ্ঠিত অসমী মেলা
বৰ্ণাঢ্য কাৰ্যসূচীৰে আজিৰে পৰা মাজুলী কছাৰী ময়দানত অনুষ্ঠিত হয় অসমী মেলা। অসম ৰাজ্যিক গ্ৰামীণ...
পল্টনবজাৰ ৰেলৱে ষ্টেচনত বৃহৎ পৰিমাণৰ বাৰ্মিজ চুপাৰি জব্দ
পল্টনবজাৰ ৰেলৱে ষ্টেচনত বৃহৎ পৰিমাণৰ বাৰ্মিজ চুপাৰি জব্দ
MCN NEWS| देशात विकासाचे वारे वाहत असून संपूर्ण देश प्रगतीच्या दिशेने-डॉ. भागवत कराड
MCN NEWS| देशात विकासाचे वारे वाहत असून संपूर्ण देश प्रगतीच्या दिशेने-डॉ. भागवत कराड