पालम:

 पालम शहरात माकडांनी धुमाकूळ घातला असून यातील माकडे माणसांवर हल्ला करत आहेत त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या शहरालगतच्या असलेल्या वटवृक्षावर माकडांचे साम्राज्य सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या परिसरात असणाऱ्या घरांवरील कवेलूचा चुराडा होत आहे. यापैकी माकडे सरळ घरात शिरून खाण्याचा वस्तू लंपास करीत आहे. अनेक वेळा या माकडांनी लहान मुलांवर आणि मानवांवर हल्ला केला आहे. परिणामी पालम शहरात या माकडाची दहशत वाढली आहे.वनविभागाने याची दखल घवून या माकडांना पकडण्यासाठी त्वरित पुढाकार घेणे गरजेचे आहे. अन्यथा माकडाच्या दहशतीत वावरणाऱ्यांना मानवहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभाग याकडे कधी लक्ष देणार असा संतप्त चव्हाण नागरिकांकडून होत आहे स्थानिक प्रशासनानेही याची दखल घेण्याची गरज आहे. ही माकडे गावातील झाडांवर आपला ठिय्या मांडून आहेत व घरातील धान्याची नासाडी करीत आहे. त्यामुळे माकडे गावात हैदोस घालत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहे. या माकडांना जंगलात पिटाळून लावावे आणि होणारा त्रास व हानी थांबवावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.