व्यायामशाळा पदाधिकारी व शवागृहातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठी यंदा नवरात्रोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे भाऊचा दांडिया. खासदार बाळू धानोरकर यांच्या संकल्पनेतून खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत 'भाऊचा दांडिया'चे आयोजन करण्यात आले आहे. यात चंद्रपूर शहरातील तरुण-तरुणी आणि महिलांनी सहभाग घेऊन गरब्यावर नृत्य करण्यासाठी फेर धरला. याप्रसंगी व्यायामशाळा पदाधिकारी व मृतांची वैद्यकीय तपासणी करताना मोलाची भूमिका निभावणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या उत्सवात सहभागी होऊन नवरात्रोत्सवामध्ये आनंद द्विगुणित केला.

यावेळी जगनगुरू व्यायाम शाळेचे डॉ. देवानंद गुरु, धर्मशील काटकर, सुहास बनकर, नामदेव राऊत तसेच विठ्ठल व्यायाम शाळेचे धनंजय येरावार, बंडूजी दुरटकर, अवघडे, अशोक अंबिरवार व पठाणपुरा व्यायाम शाळेचे विजय चहारे, श्रीकांत बोपनवार, विकास राऊत या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे शवविच्छेदन करणारे सतीश असरेट, सतीश नन्नेट, रितेश खोटे, संतोष कुडे व पठाणपुरा मोक्षधाम येथील अजय वैरागडे, श्यामसुंदर धोपटे, रमेश भुते, राज कुरेशी या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीता अमृतकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रय, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शंतनू धोटे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्यामकांत थेरे, माजी नगरसेवक सुनीता अग्रवाल, ओबीसी नेते उमाकांत धांडे, काँग्रेस युवा नेते सचिन कत्याल,  रेल्वे उपभोक्ता सलाहकर समिती सदस्य राज यादव, सेवादल महिला पदाधिकारी स्वाती त्रिवेदी, राधिका तिवारी - बोहरा, सामाजिक कार्यकर्ता बसंत सिंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस युवा नेते कुणाल चहारे, काँग्रेस युवा नेते यश दत्तात्रय, पप्पू सिद्धीकी, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, सुरज बोबडे, सिलावार यांची उपस्थिती होती.        

या  खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत 'भाऊचा दांडिया' उत्सवानिमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई-दुचाकी व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.  चांदा क्लब ग्राउंडवर ५ ऑक्टोबर २०२२ रोजीपर्यंत सायंकाळी सहा ते रात्रौ १० वाजता दांडियाची धूम राहणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी तथा मराठा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.