आयुर्वेद पर्वात

डॉ. शिवप्रसाद सानप यांचा सन्मान .

आयुर्वेद पर्व ' 2022 या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन व आयुष मंत्रालय , भारत सरकार यांच्या वतीने जंगली महाराज संस्थान , कोकमठाण शिर्डी या ठिकाणी करण्यात आले होते. 

        या आयुर्वेद पर्वात देशभरातून 2000 पेक्षा जास्त आयुर्वेदाचे डॉक्टर्स व विद्यार्थी हे सहभागी होते .

यावेळी समारोपीय कार्यक्रमात महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन , जिल्हा परभणीचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवप्रसाद दत्तराव सानप यांनी ग्रामिण भागात राहून गेल्या १९ वर्षापासून आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेद्वारे रुग्णांची यशस्वी चिकित्सा केली आहे . त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल संघटनेने घेवून डॉ. शिवप्रसाद दत्तराव सानप व डॉ. मनीषा शिवप्रसाद सानप यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला . यावेळी प्रमुख अतिथी मराठी सिनेअभिनेता चिन्मय उदगीरकर व अखिल भारतीय महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनचे अध्यक्ष डॉ. राकेश शर्मा व महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनचे अध्यक्ष डॉ . रामदास आव्हाड , संरक्षक डॉ. शशिकलाताई अहिरे , सांडू फार्माचे श्री शशांक सांडू , डॉ प्रवीण जोशी , डॉ . सतिश भट्टड , डॉ. अनिल दुबे , डॉ. महेंद्र शिंदे , डॉ . छोटेलाल यादव इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या या गौरवबद्दल जिंतूर डॉक्टर असोसिएशन व आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघटना , जिल्हा परभणी व सर्व पत्रकार बांधव यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.