जिंतुर/प्रतिनीधी
विना तथा अशांत अनुदानित् शाळेतील शिक्षक तथा शिक्षक व कर्मचाऱ्यांना १५नोव्हेंबर २०११ व ४जून २०१४ या शासन निर्णयातील वेतन अनुदान वितरित व २००५च्या शासन निर्णय प्रमाणे उपलब्ध करुन देणे जुनी पेन्शन याेजना लागू करणे आदी मागणीचे निवेदन आम आदमी पार्टी च्या वतीने जिंतूर तहसिलदार यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
विना अनुदानित शाळा व कॉलेजवर मागील गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सातत्याने अन्याय होत आहे सर्वच विना अनुदानित शाळा व कॉलेज शंभर टक्के अनुदानपात्र असून सुद्धा काहींना वीस टक्के तर काहींना चाळीस टक्के अनुदान देऊन बोळवण केली आहे बऱ्याच शाळा कॉलेज ला अद्यापपर्यंत एक रुपय सुद्धा अनुदान मिळालेले नाही जवळपास पंधरा ते वीस वर्षांपासून विनाअनुदानित शाळेत कॉलेज मध्ये सेवा करून काही शिक्षक प्राध्यापक विनावेतन निवृत्त झाले आहे भारतीय संविधानात समानतेचे संधी असताना समान काम समान वेतन या तत्त्वावर अनुदानित शिक्षक प्राध्यापक यांना मिळणे आवश्यक असताना याप्रमाणे विनाअनुदानित शिक्षक व प्राध्यापकांना वेतन मिळणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच विनाअनुदानित शाळा कॉलेजला शंभर टक्के अनुदान न दिल्यामुळे विद्यार्थ्यांना अनुदाना अभावी ग्रंथालय साहित्य प्रयोगशाळा साहित्य व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत नाही ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर विपरित परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे याविषयी शासनाने गंभीर विचार करावा तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शासन निर्णया नुसार वेतन अनुदान वितरण करून शासनाच्या जुनी पेन्शन याेजना लागू करण्याची मागणी जिंतूर तालुका आम आदमी पार्टीच्यावतीने तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर अॅड मोहसीन महेफूज पठाण स्वाक्षरी आहे