कलाश्री आयोजित गरबा दांडिया महोत्सव व फॅशन शो स्पर्धेचे आयोजन कैलास शिंदे,अपेक्षा शिंदे यांनी दिनांक २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता बीड शहरातील रामकृष्ण लॉन्स येथे केले होते.या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणून झी मराठी या वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेतील नाईका अस्मिता देशमुख उर्फ डिंपल या होत्या तर स्टार प्रवाह या वाहिनीवरील एक टप्पा हाऊस कॉमेडी फेम अँकर बालाजी सुळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कलाश्री आयोजित गरबा दांडिया महोत्सव व फॅशन शो स्पर्धे मध्ये मोठ्या गटातून तुलसी इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थिनी कु.हार्मीका बालाजी जगतकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.यावेळी मान्यवरांच्या हस्ते हार्मीकाला सात हजार रुपयांचा चेक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र डिझाईन गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले. तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीडची विद्यार्थिनी अन्विता राक्षे हिला मोठ्या गटातून तृतीय पारितोषिक मिळाले आहे. तर प्रीती शिंदेला चौथे आणि ऋतुजा आजबेला पाचवे पारितोषिक मिळाले आहे. तुलसी शैक्षणिक समूहातील विद्यार्थिनींनी या फॅशन शो स्पर्धेत आपल्या कलागुणांना सादर करत टॉप फाईव्ह येण्याचा मान मिळवला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे, तुलसी महिला मंडळ बीडच्या अध्यक्षा दीपाताई रोडे,प्राचार्य उमा जगतकर, प्राचार्य अश्विनी बेद्रे यांनी विजेत्या स्पर्धकांना त्यांनी मिळवलेल्या यशा बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  शिरूर तालुक्यात अल्पवयीन युवतीवर अत्याचार, युवती गरोदर 
 
                      पिंपळे जगताप मध्ये अल्पवयीन युवती अत्याचाराने गरोदर
( शिक्रापूर प्रतिनिधी ) पिंपळे जगताप ता....
                  
   India-China Border: LAC पर सामान्य होने लगे हालात, सेनाओं का डिसइंगेजमेंट शुरू | Aaj Tak 
 
                      India-China Border: LAC पर सामान्य होने लगे हालात, सेनाओं का डिसइंगेजमेंट शुरू | Aaj Tak
                  
   पन्नास लाखांची फसव़णूक आरोपीस दोन वर्षांची सक्तमजुरी 
 
                      औरंगाबाद: पुणे जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 25 लाख 73 हजार रूपयांची फसवणूक...
                  
   ગીર સોમનાથ જિલ્લાના વેરાવળ વડામથક ટાવર ચોકમાં આવેલ ઘડિયાળમાં અલગ અલગ સમય 
 
                      ગીર સોમનાથ જિલ્લાના વેરાવળ વડામથક ટાવર ચોકમાં આવેલ ઘડિયાળમાં અલગ અલગ સમય
                  
   Sheetal Mhatre यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच सांगितली 'ती' गोष्ट | Uddhav Thackeray|Eknath Shinde 
 
                      Sheetal Mhatre यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच सांगितली 'ती' गोष्ट | Uddhav Thackeray|Eknath Shinde
                  
   
  
  
  
  
   
   
  