भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja) यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदीही ( Modi) हरवू शकत नाहीत,’ असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर आता स्वतः पंकजा यांनी खुलासा केला आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना पंकजा म्हणतात की, मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला होता. यात मोदीजींबद्दल कुठलेही नकारात्मक उल्लेख केला नाही. मी भाषणातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात, पात, पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याकरीता नविन पद्धतीचे राजकारण करण्याचे आवाहन केले होते. या संदर्भाने मोदीजींचा उल्लेख केला होता, असे पंकजा म्हणाल्या.