औरंगाबाद: मागील काही दिवसांमध्ये देशविरोधी कारवायांचा आरोप ठेवून अटक करण्यात आलेल्या तरुणांकडून पीएफआय संघटनेच्या पैशांच्या स्रोतांची चौकशी सुरू झाली आहे . २२ सप्टेंबर रोजी शहरातून चार तर जालन्यातून एकाला तपास यंत्रणेने अटक केली . सध्या त्यांची पोलिस कोठडीत चौकशी सुरू आहे . औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यक्रमांना पैसा कुणी पुरवला , खर्च , व्यवहार कसा पार पडला , याचा तपास सुरू आहे . २२ सप्टेंबर रोजी तपास यंत्रणेने शेख इरफान शहरातून शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली ( ३७ , रा . किराडपुरा ) , सय्यद फैजल सय्यद खलील ( २८ , रा . रोजेबाग ) , परवेज खान मुजम्मील खान ( २ ९ , रा . बायजीपुरा ) , अब्दुल हादी अब्दुल रऊफ ( ३२ , रा . जालना ) , नासेर साबेर शेख ( ३७ , रा . बायजीपुरा ) यांना अटक केली . त्यानंतर औरंगाबादसह मराठवाड्यात संघटनेचे पसरलेले मोठे नेटवर्क या कारवाईतून समोर आले . औरंगाबादेतून सर्वाधिक पाच जणांना अटक करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे . मंगळवारी पहाटे तपास यंत्रणेने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत १४ जणांना नोटिसा देण्यात आल्या