शिरूर (प्रतिनिधी) येथील कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने आय.क्यू.ए.सी. विभाग व कला व सामाजिक शास्ञे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय अंतर विद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेचे उद्घाटक प्राचार्य विवेक मिरगणे तर बीजभाषक अण्णा भाऊ साठे साहित्याचे गाढे अभ्यासक तथा विचारवंत प्रोफेसर शिवाजी जवळगेकर असणार आहेत. परिसंवाद सत्रात सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे प्रमुख व्याख्याते तर अध्यक्ष म्हणून डॉ. अब्दुल अनीस अब्दुल रशीद उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. तिसऱ्या सत्रात निवडक संशोधन पेपरचे वाचन होणार असून या सत्राचे अध्यक्ष डॉ. वैशाली आहेर असणार आहेत.समारोप सत्रामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक तथा अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र संचालक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील डॉ संजय सांभाळकर संवाद साधणार आहेत. या परिषदेचे मुख्य आयोजक तथा कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासारचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे अध्यक्ष म्हणून या समारोप सत्रात असणार आहेत.

एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेत "राष्ट्रीय बेस्ट टीचर पुरस्कार-2022 साठी देहरादून येथील डॉ. प्रगती बर्नवॉल, गेवराई येथील डॉ. तबसून इनामदार आणि उस्मानाबाद येथील डॉ. सहदेव रसाळ तर "बेस्ट संशोधक पुरस्कार-2022" साठी ऐश्वर्या वसंत सानप यांची निवड करण्यात आली असून परिषदेसाठी आलेल्या निवडक संशोधन पेपर्सला "बेस्ट रिसर्च पेपर पुरस्कारही" यावेळी देण्यात येणार आहे. यासाठी प्रा डॉ. एम.बी. राख (पाटोदा), प्रा. डॉ. अहिल्या बरुरे (अंबाजोगाई) प्रा डॉ. शिवाजी गायकवाड (उस्मानाबाद) प्रा डॉ. शैला गुप्ता (देहरादून) प्रा डॉ. उषा खंडाळे (चंद्रपूर) यांची निवड करण्यात आलेली आहे. हे सर्व पुरस्कार उद्घाटन सत्रामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन सर्व प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे यांनी पत्रकाराशी बोलताना दिली.