नवरात्र उत्सवा निमित्त भोगाव देवी येथे भाविकांची गर्दी

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथे सध्या नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली असल्याचे पहावयास मिळत आहे.

जिंतूर शहरापासून 12 कि.मी अंतरावरील जिंतूर-औंढा रोडवर भोगावदेवी तलावाकाठी श्री देवीसाहेब जगदंबा मातेचे रामायण कालीन हेमाडपंती मंदिर उभे आहे आई जगदबेचे हे मंदिर तुळजापूरच्या तुळजाभवानीचे उपपीठ मानले जाते

सीतेचे हरण झाल्यानंतर त्याचा रोध घेण्यासाठी प्रभू श्रीराम श्री क्षेत्र नाशिक परिसरात फिरत होते.त्या ठिकाणी त्यांना एका महर्षींने कार्यसिद्धीसाठी भोगाव देवी येथे आदिशक्ती जगदंबा मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यास सांगितले होते.त्यानुसार त्यांनी स्वतः या ठिकाणी जगदंबेची प्राणप्रतिष्ठा केल्याची अख्यायिका आहे.

मंदिरासमोर 25 फूट उंचीची दगडी दीपमाळ आहे. प्रवेशद्वार लहान असून मुळ मंदिराचा हेमाडपंती गाभारा आढळून येतो. यामध्ये श्री देवीसाहेब जगदंबेची सुंदर मूर्ती 25 किलोच्या चांदीच्या सिहासनावर आहे.नवरात्रात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. नवरात्रात 9 दिवस शेकडो महिला इच्छापूर्ती करण्यासाठी आपला उपवास करतात. व आपला नवस फेडतात.जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणाहून येथे भक्त मोठ्या संख्येने येत असतात.नवरात्रीच्या काळात या ठिकाणी मोफत अन्नछत्र चालविले जाते.संस्थानला एकूण 150 एकर जमीन आहे. मंदिर परिसर हा 23 गुंठ्यांत हा आहे. निसर्गरम्य डोंगर माथ्यावर मंदिर आहे.मंदिरासमोरील सुमारे 60 एकराच्या तलावात प्रचंड पाण्याचा साठा आहे.