--------

परतूर, लम्पि व चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने तालुक्यात पशुधनाचे लसीकरण केले जात आहे.मंगळवारी(ता.२७)रोजी तालुक्यातील हातडी लसीकरन शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच मधुकर झरेकर, बाबासाहेब राऊत, कैलाशराव कादे,ग्रा. सदस्य प्रकाश पाईकराव,तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.सुयश तांगडे, डॉ.सुनिल लांडगे साहेब,डॉ. नीलेवाड ,डॉ. बालानंद गाढवे, मदनराव बोरकर, ओमप्रकाश आबा बोरकर,प्रा. प्रशांत झरेकर, नाथाराव बोरकर, विठ्ठल वाघमारे, किशन बोरकर, मुक्तिराम फट्टींग,विठ्ठल गोरे व परिसरातील पशुपालक शेतकरी यांची पशुधनासह मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

दरम्यान, यावेळी दोनशे जनावरांना लसीकरण देण्यात आले.

कोट......

लम्पि आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुपालकांना काळजी वाटत होती.यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कपिल आकात याच्या मार्गदर्शनाखाली गावात जनजागृती करत पशुधनाचे लसीकरण करण्यात आले.यामुळे आता चिंता दूर झाली आहे.

मधुकर झरेकर,सरपंच, हातडी

फोटोओळी:हातडी येथे लसीकरण शिबीर यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष कपिल आकात,मधुकर झरेकर आदी दिसत आहे.