जनता न्यूज चॅनल प्रतिनिधी
माबुद खान
जिंतूर तालुक्यातील बोरी महसूल मंडळातील सोयाबीन या पिकावर पावसाचा खंड व येल्लो मोझॅक या रोगामुळे पिकांचे पाने गळणे झाडे जळणे यास अनेक अनेक प्रकार घडल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून सोयाबीन पिकासह इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. बोरी मंडळातील सर्वेच गावे ॲग्रीम मध्ये समावेश करण्याची मागणी माँ जिजाऊ सेवाभावी संस्थेच्या वतीने दिनांक 27 सप्टेंबर मंगळवार रोजी जिंतूर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर मा जिजाऊ सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. या निवेदनावर अजिंक्य भोसले, इर्शाद पाशा सिद्दिकी, शेख नईमोद्दीन कौसडीकर, प्रसाद अंभुरे, लखन अंभुरे, वैभव अंभुरे, सलीम पठाण, संदीप अंभुरे, रामप्रसाद, अजित अंभुरे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे स्वाक्षऱ्या आहेत.