आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी परभणी शहरातील सुमन ताई गव्हाणे विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना व पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार जनजागृती कार्यक्रम मानवाधिकार चे मराठवाडा अध्यक्ष मा. राहुल नामदेव पाईकराव यांच्या अध्यक्षतेखाली व मा. प्रा. रफीक शेख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या प्रसंगी ' माहिती अधिकार काळाची गरज ' या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करून पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख अधितिगणाचे स्वागत विद्यालयाच्या बँड पथका मार्फत बँड वाजवून करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माहिती अधिकारचे मराठवाड़ा उपाध्यक्ष मा. यंकटी नरबाजी मोरे व माहिती अधिकारच्या मराठवाडा विभागीय महिला वरिष्ठ उपाध्यक्ष सौ. सावित्री प्रल्हाद लाखुडे यांची होती. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंटरनॅशनल ह्युमन राईट्सच्या परभणी जिल्हा अध्यक्षा सौ. संघमित्रा दामोधरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेच्या युवा उपसचिव कु. सृष्टी मुळे यांनी केले.

या वेळी मा. दिनाजी विठ्ठल गायकवाड, सौ. धम्मशिला दिनाजी गायकवाड, चंद्रप्रकाश भीमराव वाळके, सौ. सूर्यकांता माधव गायकवाड, स्वप्निल मनोहर मोरे, संदिप ढोंडबाराव होडगीर, कोंडिबा गौनाजी मस्के व विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.