आष्टी( प्रतिनिधी )आष्टी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना विद्यार्थी व नागरिकांना कळविण्यात येते की आरोग्य विभागामार्फत गुरूवार
दिनांक.29.09.2022 रोजी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे अस्थिव्यंग,कर्णबधिर, बहुविकलांग,अंध इत्यादी 21 प्रकारच्या दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र UDID (Unique Disability ID) काढण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे व नागरिकांकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र नाही अशा व्यक्तींनाच दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कॅम्पचे आयोजन केलेले आहे यापूर्वी जर दिव्यांग बांधवाकडे दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर त्यांनी या शिबिरामध्ये दाखल होण्याची कोणतीही गरज नाही.तरी शिक्षक बांधवांनी आपल्या शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना व ग्रामसेवक व तलाठी बांधवांनी गावातील दिव्यांग नागरिकांना दिव्यांग बांधवांना कळवावे.दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक असेल तर पुढील कागदपत्रांसह शिबीर स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन दिव्यांग नेते शिरीषभाऊ यांनी केले.कोणाला अडचण आल्यास या नंबरवर 90678 87167 संपर्क साधावा.
*प्रमाणपत्रा साठी आवश्यक कागदपत्रे :* विद्यार्थी आधार कार्ड,रेशन कार्ड,दोन पासपोर्ट साईझ फोटो,चालू मोबाईल क्रमांक,काही वैद्यकीय उपचार चालु असतील तर संदर्भ घेण्यासाठी हॉस्पिटल ची फाईल,यापूर्वी ऑफलाइन किंवा यु डी आय डी नसलेले दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आष्टी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील दिव्यांग बांधवांनी हजर रहावे असे आवाहन दिव्यांग संघटनेचे नेते थोरवे यांनी केले.