केज (प्रतिनिधी) केज तालुक्यातील बनसारोळा गावातील शेतकरी लालासाहेब व्यकंट रोकडे हे त्यांच्या चुलते किसन दादाराव रोकडे यांच्या सोबत मोटारसायकल वर शेतात जात आसताना .पाटीमागुन येणाऱ्या चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्यामुळे लालासाहेब रोकडे वय 46 यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्यामुळे आंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले आसता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.तर किसन दादाराव रोकडे याच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चारचाकी वाहन चालक जाग्यावरुन पसार झाला. चारचाकी गाडी क्रंमाक MH 44 Z 2120 असुन पुढील तपास युसुफवडगाव पोलीस करत आहेत