शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दोन ग्रामपंचायत सदस्यांसह शिवसेना शिंदे गट मध्ये प्रवेश

वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य असलेले गंगेची वाडी उमटे या रामराज विभागातील शेतकरी कामगार पक्षाचा अनेक कार्यकर्त्यांनी व येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांनी शेकापला दे धक्का देत आमदार महेंद्र  दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गट मध्ये प्रवेश केला असून शेतकरी कामगार पक्षाचे या ठिकाणी असणारी एकाधिकारशाही मोडून काढत शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व गंगेचे वाडी मधून नाहीसे करून या ठिकाणी एक मुखी शिवसेना शिंदे गटचे आमदार माननीय महेंद्र दळवी यांना पाठिंबा दर्शवला आहे

शेतकरी कामगार पक्षाने अनेक वर्ष रस्त्याचे आश्वासना देऊन या ठिकाणी कोणतेही काम केले नाही फक्त खोटी बीला खाऊन लोकांच्या तोंडाला पाने पुसले आहेत

हे आता येथील कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी शेकाप नेत्यांवर तोंडसुख घेत महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी जाऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य नारायण कुशा पिंगळा व  मंजुळा राजेंद्र उघडा ग्रामपंचायत बोरघर सदस्य लहू रामा दरोडा सुनील गजानन दरोडा कृष्णा नागो पिंगळा दिलीप नागूपिंगळा विकास भास्कर लोभी चंदू नागोपिंगळा निकेश नामदेव सूर्यकांत गणपत पिंगळा नामदेव गोविंदा लेंडी बाळकृष्ण गणपत पिंगळा कृष्णा तानाजी गडकर मंगळा नागो पिंगळा हरी नागोपिंगळा मंगळा लक्ष्मण हंबीर गजानन रामा दरोडा राजाराम गजानन झावरे संतोष मनोहर धापसे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला अखेरचा लाल सलाम केला सदरच्या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना नेते बाळासाहेब तेलगे रायगड जिल्हा प्रमुख राजा भाई केणी जिल्हा संघटक मयुरेश भाई गंभीर तालुका संघटक जीवन पाटील युवा सेना जिल्हा समन्वय क अजय गायकर जनार्दन भगत उत्तम शेठ पाटील प्रमोद पाटील युवा सेना उपतालुकाप्रमुख संकेत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते