श्रीपूर (ता.माळशिरस) परिसरात चोरून मटका घेणाऱ्या दोन मटक्याच्या अड्ड्यावर अकलूज पोलिसांनी अचानक धाड टाकून मटका घेणाऱ्यांना रंगेहात पकडून त्यांच्यासह मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेको मदभावी, पोहेकॉ विकी घाटगे, पोहेकॉ रामचंद्र चौधरी, पोहेकॉ सुहास क्षिरसागर हे श्रीपूर परिसरात पेट्रोलिंग करत असताना खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहिती प्रमाणे सुरुवातीला सत्यम हॉटेलचे पाठीमागे आरोपी प्रविण बाळकृष्ण बाबर, वय 32 वर्षे रा. मिलिंदनगर श्रीपुर ता. माळशिरस याने येणारे जाणारे लोकांकडुन येणारे अंदाजे अंक आकडयावर पैसे लावुन घेवुन कल्याण मटका नावाचा जुगार घेत असताना आढळून आला.

तर दुसरीकडे, श्रीपुर येथील मारुती मंदीराजवळ आरोपी मलंग गंगाराम लेढि वय 65 वर्षे रा. मिलिंदनगर श्रीपुर ता. माळशिरस असे याने येणारे जाणारे लोकांकडुन येणारे अंदाजे अंक आकडयावर पैसे लावुन घेवुन कल्याण मटका नावाचा जुगार घेत असताना आढळून आला. याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता. त्याने मालक अल्लाबक्ष चांदसो शेख रा. श्रीपुर यांच्याकडे काम करत असल्याचे सांगितले.

अकलूज पोलिसांनी या दोघांवरती ही कारवाई करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास अकलूज पोलीस करीत आहे.