पैठण : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेर्तगत तालुक्यातील धनगाव ववा वडाळा कासारपाडळी बालानगर हा नऊ किलोमीटर रस्ता सन 2009 मध्ये झाला.त्यांनंतर पाच वर्षे रस्ता दुरूस्त करणे त्याच विभागाचे काम होते.मात्र किरकोळ दुरुस्ती झाली.धनगाव ववा वडाळा कासारपाडळी बालानगर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांंसह सामाजिक कार्यकर्ते संदिप पडुळ यांनी दि 25 सप्टेंबर रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,धनगाव ववा वडाळा कासारपाडळी बालानगर रस्त्याची चाळणी झाली आहे.या रस्त्यावरुन ये जा करणे गावकऱ्यांना कठीण झाले आहे.हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांंतरित झाला पाहिजे होता मात्र तो झाला नाही.त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत किंवा जिल्हा परिषद बांधकाम फंडातून हा रस्ता होणे आवश्यक होते.तसे ही झाले नाही. अनेकदा हा रस्ता घेतला आहे असे तोंडी सांगितले.बऱ्याच वेळा गावकरी सामाजिक कार्यकर्ते संदिप पडुळ यांनी या रस्त्याच्या दुरुस्ती बद्दल चर्चा केली असता परंतु अद्यापही रस्ता दुरुस्ती करण्यात आला नाही.आडुळ बालानगर सर्कल अंतर्गत हा रस्ता महत्वपूर्ण रस्ता आहे.मात्र आजरोजी हा रस्ता बंद पडल्यात जमा आहे.या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.तालुक्यातील धनगाव ववा वडाळा कासारपाडळी बालानगर हा रस्ता तात्काळ दुरूस्त करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.