मन्ना जुगार खेळणारे 8 जणांना ताब्यात ; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
सोलापुर :- दक्षिण सोलापुर तालुक्यातील बोरामणी येथे गावाचा शिवारातील पडीक असलेल्या पत्राच्याशेड मध्ये मन्ना जुगार खेळणारे 8 जणांवर सोलापुर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून 6 लाख 64 हजार 440 रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. यामध्ये रोख रक्कम ,एक कार ,दोन मोटारसायकल अशा मुद्देमाल आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते ,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सुहास जगताप,यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.नागनाथ खुणे , पोसई शैलेश खेडकर , सपोफौ / शिवाजी घोळवे , पोहवा / परशुराम शिंदे , मोहन मनसावाले , पोना / लालसिंग राठोड , पोकॉ / यश देवकते , सुरज रामगुडे , समर्थ गाजरे व चापोहवा / प्रमोद माने यांनी बजावली आहे .