विष बाधित भगर खाल्ल्याने शहंर व वैजापूर तालुक्यातील विष बाधित रुग्णांवर शहरातील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी डॉक्टर्स यांनी योग्य व तातडीने उपचार केल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही व रुग्ण ही आटोक्यात आले आहेत. बुधवार(ता,२८)रोजी जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडिरामसिंह राजपूत यांनी उपजिल्हा
रुग्णालयात भेट दिली असता वैद्यकीय अधीक्षक डॉ,गजानन टारपे यांनी सांगितले की, रुग्णालयात ५३ बाधित रुग्ण दाखल झाले होते, आज फक्त चार रुग्ण उपचार घेत आहेत. बहुतेक खाजगी रुग्णालयात ही रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण घटले आहे. राजपूत व डॉ. टारपे यानी वार्डात दाखल चारही रुग्णची चर्चा केली ते ठणठणीत आहेत. त्यांना आज सायंकाळ पर्यंत सुट्टी देण्यात येणार असुन राजपूत यांनी उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर्स व कर्मचाऱ्याना धन्यवाद दिले. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.मुंढे, डॉ.गायकवाड डॉ.पाटणी, डॉ.धोत्रे व परिसेविका रुखमींनी गवई, श्रीमती केदारे, श्रीमती सातदिवे,व सहायक एस.बी. उचित, एम. एम. मापारी, अजय जाधव, आर.टी.नारळे, बी.के. दुधारे, यांनी या रुग्णांवर उपचारासाठी सहकार्य केले.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं