पैठण :जुन ते ऑगस्ट 2022 या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यासह पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत पंचनाम्याचा अग्रह न धरता नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा दि.10ऑक्टोबर 2022 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन व निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव माऊली मुळे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जुन ते ऑगस्ट 2022 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यासह पैठण तालुक्यात अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे.शेतकऱ्यांना प्रचलित दरापेक्षा जास्तीची नुकसान भरपाई देण्यात यावी.तसेच दसरानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे बॉयलर पेटणार आहे.पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांची बाहेरील कारखान्याकडुन लुट होत असल्याने ती लुट टाळण्यासाठी सर्व कारखान्यांचे प्रतिनिधी शेतकरी संघटना, व शेतकऱ्यांची बैठक बोलावून त्यात ऊस दर व इतर बाबी निश्चित करणे गरजेचे आहे.यासाठी संयुक्त सभेचे आयोजन करण्यात यावे अन्यथा दि.10ऑक्टोबर रोजी रास्तारोको आंदोलन निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव माऊली मुळे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे