पैठण : बिडकीन येथील कला महाविद्यालयात नुकतेच हिंदी पंधरवडा अंतर्गत हिंदी दिन समारंभ तथा मराठी विभागामार्फत साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अय्युब पठाण लोहगावकर यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सांगितले की,आज काल सज्जन माणसे आणि चांगली पुस्तके भेटत नाहीत.यावेळी पठाण यांची बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेलली "पाणपोई"या कवितेचे प्रभावी वाचन केले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन आहेर हे होते.तसेच कार्यक्रमाचे आयोजक डॉ. शेख मुखत्यार,डॉ. शेख मोहसीन,डॉ.अर्चना काटकर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शेख मुखत्यार यांनी केले.यावेळी डॉ. प्रसाद करंदिकर,डॉ. अर्चना सोनवणे,डॉ. अंजली काळे,डॉ. रामकिसन मुंडे,संभाजी आंधळे,आप्पासाहेब थिटे,शेख कय्युम यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कु.साक्षी भाले यांनी केले.तर आभार प्रदर्शन डॉ शेख मोहसीन यांनी मानले