माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे वासराचा बळी घेणारा आणि विजयवाडी येथे काही नागरीकांच्या निदर्शनास आलेला बिबट्या सदृष प्राणी बिबट्या नसुन तरस असल्याचा खुलासा माळशिरस वन विभागाने केला आहे.त्यामुळे अकलुज व तालुक्यात पसरात बिबट्या आला असल्याची माहिती ही केवळ अफवा आहे.त्यामुळे नागरीकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता घाबरुन न जाण्याचे अवाहन माळशिरस वन परीक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे यांनी केले आहे.