पाथरी(प्रतिनिधी)बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने शहर व जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशन, सोलापूर आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय ,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धेचे आयोजन 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत बारा वर्षांतील मुले व मुली तसेच पुरुष व महिला खुल्या गटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या .या स्पर्धेत 21 संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महिला गटाचा परभणी विरुद्ध ठाणे जिल्हा या संघामध्ये चुरशीचा अंतिम सामना झाला . या चुरशीच्या सामन्यात परभणी जिल्हा द्वितीय क्रमांक पटकावला तर मुलांमध्ये पुरुष गटाने तृतीय क्रमांक पटकावला. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महिला गटातून परभणी जिल्ह्याच्या तीन मुलींची निवड झाली तसेच मुलांमधून दोन मुलांची निवड झाली आहे . या सर्व यशस्वी खेळाडूंचा परभणी जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य भैया नखाते यांनी सत्कार केला राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी परभणी जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशनचे सचिव भरत घांडगे उपाध्यक्ष तुकाराम शेळके कार्याध्यक्ष सहदेव पुरी , अनिल थोरे,प्रशिक्षक राम शहाणे सर यांनी अभिनंदन केले .परभणी जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशन या संघामध्ये वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय पाथ्री , कासापुरी, देवगाव फाटा , वालुर व जिल्हा परिषद केंदिय प्राथमिक शाळा पाथरगव्हान इत्यादी शाळेने सहभाग नोंदवला होता . या सर्व खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त करून दिले आहे .या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष अनिल भाऊ नखाते, सचिव सौ. भावनाताई नखाते, संचालक आदित्य भैया नखाते , रमेश सरोदे मुख्याध्यापक डहाळे के. एन. , मुख्याध्यापक यादव एन.ई., सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
বৰহোলাত সংঘটিত হৈছে এক বিধ্বংসী অগ্নিকাণ্ডৰ ঘটনা
বৰহোলাত সংঘটিত হৈছে এক বিধ্বংসী অগ্নিকাণ্ডৰ ঘটনা। নিমিষতে জ্বলি ছাই হয় এটা বাসগৃহ। বহু...
Indian Squad for World Cup 2023: वर्ल्ड कप में Rohit Sharma होंगे कप्तान, Team India ने किया ऐलान
Indian Squad for World Cup 2023: वर्ल्ड कप में Rohit Sharma होंगे कप्तान, Team India ने किया ऐलान
વીરપુર લાવેરી નદીના દરગાહ પુલ પર પાણી ફરી વળતા પબ્લિકની અવરજવર પર પોલીસ દ્વારા રોક લગાવવાની ફરજ પડી...
મહીસાગર જિલ્લામોં સર્વત્ર વરસાદની ધમાકેદાર એન્ટ્રીના પગલે તારાજી સર્જી છે ત્યારે નદીનાળા છલકાયા...