रणजितसिंह शिंदे वन मॅन आर्मी ; सर्वसाधारण सभेत सर्वांचे समाधान
सोलापूर :- अनेक वर्षापासून अडचणीतून जात असलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाची 40 वी सर्वसाधारण सभा सोलापूर जिल्हा बँकेच्या सभागृहात मंगळवारी संपन्न झाली.अध्यक्षस्थानी चेअरमन रणजितसिंह शिंदे होते, व्यासपीठावर व्हाईस चेअरमन दीपक माळी, संचालक सुरेश हसापुरे, मनोज गरड, अलका चौगुले, बाळासाहेब माळी, राजेंद्र मोरे, संभाजी मोरे, विजय येलपले, मारुती लवटे, औदुंबर वाडदेकर, वैशाली शेंबडे, निर्मला काकडे, छाया ढेकणे, राजेंद्रसिंह पाटील, ऍड मारुती ढाळे यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक राजू सुगरोळीकर यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेच्या अजेंडा वरील विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी भाऊसाहेब धावणे यांच्यासह सभासदांमधून अनेक प्रश्न आले मात्र प्रत्येक प्रश्नाला स्वतः चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी उत्तरे देऊन प्रत्येकाचे समाधान केल्याचे पाहायला मिळालं.
यावेळी जिल्हा दूध संघाला येणाऱ्या दुधाच्या क्वालिटी तसेच दूध संकलनाचा विषय मांडण्यात आला, प्रत्येक संचालकांना दूध डेरी काढण्याच्या सूचना केल्याचे सांगत दुधाच्या क्वालिटीमध्ये कुठेही फरक आढळल्यास अथवा केमिस्टने हाय काय केल्यास सस्पेंडच नाही तर थेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करीन असा इशाराही चेअरमन शिंदे यांनी यावेळी दिला.