परभणी(प्रतिनिधी)परभणी विधानसभा मतदारसंघातील तट्टूजवळा व मिरखेल या गावातील जवळपास 95 नागरीक सोमवारी (दि.26) मुंबईकडे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना झाले. 

यावेळी संभानाथ काळे, संदीप झाडे, गोपीनाथ झाडे, उपसरपंच नागनाथ देशमुख, रामा कदम, बाबु फुलपगार व शिवसेना-युवासेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

परभणी विधानसभा मतदारसंघात आ.डॉ. राहुल पाटील यांच्या वतीने मतदार संघात विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या 'आमदार आपल्या दारी' कार्यक्रमात तसेच आरोग्य शिबीरात नागरीकांची नेत्रतपासणी करण्यात आली. या नेत्र तपासणी शिबिरात ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यावतीने गेल्या एक वर्षांपासून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील जे.जे. रुग्णालय येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. आजपर्यंत जवळपास 7 हजार नागरीकांच्या यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.