मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी होमगार्ड कर्मचाऱ्याचा अपघात...
होमगार्ड दिलीप गायकवाड चा जीवनपटाची बिकट परिस्थिती निर्माण....
बिडकिन प्रतिनिधी:- दि.१७ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने पोलिस ठाणे अंतर्गत पैठण होमगार्ड कार्यालय येथे होमगार्ड दिलीप गायकवाड,बकल नं.१४५३ यांची दिवटी लावण्यात आली होती.पैठण होमगार्ड कार्यालय येथे आपले कर्तव्य बजावुन बिडकिन येथे येत असताना रस्त्यावरील पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे व इतर पाळीव प्राणी मोटारसायकल समोर अचानक आल्याने त्या पाळीव प्राण्यांस वाचविण्यासाठी प्रयत्न करत असताना मोटारसायकल वरून अपघात झाल्याने होमगार्ड गायकवाड यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या असुन उजवा पाय फॅक्चर झाल्याने औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते सद्यस्थितीत दवाखान्याचे वैद्यकीय सल्ल्यानुसार आराम करत आहेत.यावेळी होमगार्ड दिलीप गायकवाड हे पोलिस होमगार्ड म्हणून बर्याच वर्षांनी आपले कर्तव्य बजावत आहेत.होमगार्ड गायकवाड यांना शासकिय योजना अंतर्गत मोबदला मिळावा, वैद्यकीय खर्च, रोजगार भत्ता,तसेच कामगार विमा तसेच इतर शासकिय योजना अंतर्गत मोबदला मिळावा अशी मागणी होमगार्ड दिलीप गायकवाड है करित आहेत...