पैठण: ढोरकीन येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने श्रीमदभागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यासह हरिकिर्तन महोत्सवाचे सोमवार दि.26सप्टेंबर पासुन आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा वारकरी संप्रदायाचे बद्रीनाथ पाटील लिपाने यांनी दिली.श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात रोज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कथा हरिकिर्तन,सायं.7 ते 9 दरम्यान होणार आहे.सदरील सप्ताह दि.26 ते बुधवार 1ऑक्टोबर पर्यंत चालणार असुन या सोहळ्यात कथा प्रवक्ते,हभप विष्णू देशमुख महाराज ह.भ.प.तथा युवा किर्तनकार दिपक महाराज उगले ह भ.प.पांडुरंग महाराज उगले,रामेश्वर महाराज भवर,महादेव महाराज गिरी,हभप सुधाकर महाराज वाघ,हभप सचिन महाराज ढोले,हभप अंकुर महाराज गलधर यांचे हरिकिर्तन होणार आहे.पंचक्रोशीतील भाविकांनी या हरिकिर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ  आयोजक बद्रीनाथ पाटील लिपाने यांनी केले आहे.