*समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने गरजू रुग्णाला मदत.*

आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या मदतीसाठी एका अज्ञात व्यक्तीचा समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे यांना फोन आला असता प्रमोद अंभोरे यांनी राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, आणि सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ खिल्लारे यांना सोबत घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णाची भेट घेतली असता असे कळाले की रुग्ण वैभव काशिदे व त्याचे वयवृद्ध आजोबा लक्ष्मण पुंडगे हे सकाळ पासून उपचारासाठी आले असता त्यांना दवाखान्यातील काहीच समजत नसल्या कारणाने कोठे जावे, काय करावे या साठी ते परेशान झाले होते असे त्यांनी सांगितले. या दरम्यान असे लक्षात आले की त्या रुग्णाच्या गुडघ्यात पाणी झाल्या कारणाने त्याला चालता येत नव्हते. तेंव्हा शेख अझहर यांनी व्हीलचेअर वर रुग्णाला ओटी पासून ते दुसऱ्या मजल्यावरून खाली आणण्यापर्यन्त त्यांनी मदत केली. त्या वेळी तात्काळ संबंधित डॉक्टरांशी भेटून त्यांच्या पायातील पाणी काढून उपचार देण्यात आले. डॉक्टरांनी वेळेत उपचार केल्यामुळे समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने संबंधित डॉक्टरांचे आभार मानले. वेळेत उपचार मिळवून देण्यास मदत केल्याबद्दल रुग्ण वैभव काशिदे व रुग्णाचे नातेवाईक आजोबा लक्ष्मण पुंडगे यांनी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे आभार मानले.

शेख अझहर शेख आसिफ

राज्य प्रसिध्दी प्रमुख समाजहित अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य.

मो. 7058067029