माळशिरस तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायत या ठिकाणी तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना माळशिरस यांच्या वतीने महालोकन्यायालयाचे आज आयोजन करण्यात आले होते.

वेळापूरच्या सरपंच विमल जानकर, उपसरपंच जावेद मुलानी, ग्रामविकास अधिकारी दीपक गोरे यांच्यासह न्यायाधीश मंडळींच्या उपस्थितीत या लोकन्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले.