माळशिरस तालुक्यातील उंबरे दहिगाव या ठिकाणी आज लोक कल्याणकारी शासकीय योजना कार्यालय माळशिरस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने व तहसील कार्यालय माळशिरस यांच्या सहकार्याने रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील अडचणी गावातच सुटाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत असून याच अनुषंगाने गावांमध्ये या रेशन कार्ड शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये 200 हून अधिक नागरिकांनी रेशन कार्ड संबंधित असणाऱ्या अडचणी सोडवून घेतल्या.