माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतु स्पर्धा परीक्षाकेद्र माळशिरसच्या वतीने माळशिरस तालुक्यातील इयत्ता 12 वी,

पदवीचे शिक्षण घेत असलेले व जे पदवीधर असून सध्या स्पर्धाप रीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी अकलूजमधील स्मृती भवन येथे आयोजीत केलेल्या एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे प्रास्ताविक

श्री.अमरसिंह पाटील उपाध्यक्ष माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानयांनी केले.सदर मार्गदर्शन शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप स्वामी IAS, माळशिरस तालुका उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. बसवराज शिवपूजे, अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. दयानंद गोरे, माळशिरस तालुका गट विकास अधिकारी श्री. विनायक गुळवे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्री. इंद्रजीत यादव, स्पर्धा परीक्षा क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा/ मार्गर्शनाचा ठसा उमटविणारे दी लॉयन करिअर अकॅडमीचे संचालक श्री. उत्तम पवार, श्री. अमोल ताकमोघे गट विकास अधिकारी पंचायत समिती निलंगा, श्री. लक्ष्मण डाके उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज, श्री. अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक अकलूज, श्री. किरण मोरे सहा. गट विकास अधिकारी माळशिरस आदी अधिकारी उपस्थित होते.