आज रोजी मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सह. महर्षी शंकरराव मोहिते पाटील सह परिषद महाराज्य यांचेवतीने माळशिरस तालुक्यातील विविध विभागात कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी यांचा मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील, पंचायत समिती माळशिरसचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सह. महर्षी शंकरराव माहिते पाटील सह परिषदचे राज्य अध्यक्ष प्रकाश कराळे, पंचायत समिती माळशिरसचे माजी सभापती रावसाहेब पराडे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, सहाय्यक गटविकास अधिकारी मोरे, मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, पुणे विभागीय कार्याध्यक्ष रवींद्र पवार तसेच मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. रामचंद्र मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती माळशिरस येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज सभागृहात पंचायत समिती माळशिरस येथील कार्यरत असणारे विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना राज्य पातळीवरील, विभागीय पातळीवरील व जिल्हा पातळीवरील गुणवंत कर्मचारी म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.