औरंगाबाद, शासनामार्फत मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरीता विविध योजना राबविल्या जात आहे . बँकांशी संबंधित असणाऱ्या योजनांचे कर्जवाटप करताना बँक अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे काम करावे अशा सूचना केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ . भागवत कराड यांनी आज येथे दिल्या . विभागीय आयुक्त कार्यालयात किसान क्रेडीट कार्ड योजना आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनांची विभागीय आढावा बैठक घेण्यात आली . बैठकीला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर , जिल्हाधिकारी सुनील चव्हाण , महापालिका आयुक्त डॉ . अभिजित चौधरी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे , उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता , महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय व्यवस्थापक महेश डांगे , मुख्य व्यवस्थापक मंगेश केदारे यांच्यासह दुरदृश्य संवादप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदांचे व नगर पालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी , महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते .