गंगाखेड 

तालुक्यातील १०५ गावातील लोकांना लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी सुध्दा गंगाखेड रेल्वे स्थानकाचा आधार घ्यावा लागतो. तसेच दिवसभर गाड्यांची आवक-जावक असल्याने प्रवाशांची दिवसभर वर्दळ असते. 

परंतु अपंग, विकलांग

आणि आपत्कालिन रुग्णांना ने-आण करण्यासाठी रेल्वे स्थानकात असलेली व्हिलचेअर कोरोना पासून खराब झाली होती. त्यामुळे तिचा वापर करताना तारांबळ होत असे, हि माहिती गंगाखेड विधानसभेचे संवेदनशील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या पर्यत पोहोचली. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासून त्यांनी स्वखर्चाने दोन व्हिलचेअर रेल्वे प्रशासनास उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आ.डॉ. गुट्टे यांची तत्परता रेल्वे प्रशासनाने जवळून अनुभवली.

दरम्यान, गरजू प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी या दोन व्हिलचेअर दिल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या सोईसाठी वैजवाडा-शिर्डी आणि सिंकिदराबाद-शिर्डी या दोन गाड्यांसाठी थांबा मिळवण्यासाठी लवकरच पत्रव्यवहार करुन रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांना भेटणार असल्याचे आ.डॉ.गुट्टे यांनी सांगितले.

यावेळी गुट्टे (काका) मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, रासप शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, अँड.मिलिंद क्षिरसागर, पत्रकार पिराजी कांबळे, स्टेशन मास्तर आमरेश श्रीवास्तव, बुकींग इनचार्ज शिवाजी दौंड, बालासाहेब शिंदे, शैलेश ढेरे, संजय पारवे, रेल्वे पोलिस संतोष घुगे, मुकुल फराळे, गया पासवान, आतिश लहाने, पार्किंग व्यवस्थापक विजय साळवे, उपहारगृह चालक त्र्यंबक नागरगोजे, नागेश माळवे, महादेव मुंढे, सोमनाथ नागरगोजे, अंगद मुंढे, शिवा ओळंबे, हाजी शेख, इम्रान शेख, अभिजीत चक्के, सचिन राठोड, मदन बनसोडे, दुर्गेश वाघ, प्रभाकर सातपुते यांच्यासह प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार पिराजी कांबळे तर आभार शिवाजी दौंड यांनी व्यक्त केले.