जिंतुरात रंगणार नवरात्रोत्सव
खास महिलांसाठी दांडिया कार्यक्रम
आमदार मेघना बोर्डीकरांच्या मार्गदर्शनात दिपस्तंभ प्रतिष्ठाणचा पुढाकार
जिंतूर--आमदार मेघना बोर्डीकरांच्या पुढाकाराने आयोजित शहरात नवरात्रोत्सव या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार येणार असल्याची माहिती आमदार मेघना बोर्डीकरांनी दिली आहे.दिपस्तंभ प्रतिष्टाणच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. ज्या उपक्रमात विशेषतः महिला व विद्यार्थीनीच्या हिताचे सामाजिक बांधिलकी जपत असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्याचे त्यांचे विविध प्रश्न सोडविण्याचे सतत प्रयत्न केले जातात.या वर्षी नवरात्रोत्सवा निमित्त खास महिलां साठी आयोजित दांडिया कार्यक्रमा साठी मुख्य आकर्षण हार्दिक जोशी( राणादा) व अक्षया देवधर( अंजली) फेम "तुझ्यात जीव रंगला" मधील सुप्रसिद्ध ही कलाकार जोडी उपस्थित राहणार आहेत.
तरी या दांडिया कार्यक्रमास जास्तीतजास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले आहे.सदर कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वा.आमदार कॉलनी मधील "नयन स्वप्न" जवळील मैदानावर आयोजित केलेला आहे.