बीड ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील बंगालीपिपंळा पंचायत समिती गणातील ७३ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मा विजयसिह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला.मोजे वडगाव येथे ४ लक्ष रूपये किमतीच्या पेव्हर ब्लॉक,मौजे सुशी येथे जलजीवन मिशन अंतर्गत ४३ लक्ष रूपये किंमतीची नळ पाणीपुरवठा योजना . मौजे सुशी ताडा येथे ६ लक्ष रूपये किमतीचा सिमेंट रस्ता आणि २० लक्ष रुपये किमतीच्या सुशी ग्रामपंचायत भवन बांधकामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक पचायत समिती सदस्य परमेश्वर खरात व ग्रामस्थांनी केले यावेळी विकास कामे दर्जेदार करण्याचे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले.
गेवराई पंचायत समितीचे सदस्य तथा राष्टूवादी कॉग्रेसचे गटनेते परमेश्वर खरात यांनी बंगालीपिपळा गणात विविध विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील विकास कामांना गती मिळाली पंचायत समितीमध्ये सातत्याने आक्रमक भूमिका त्यांनी घेतली त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामूळे अनेक दिवसापासून प्रलंबित विकास कामे मार्गी लागली आहेत असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले.बंगालीपिपळा पंचायत समिती गणातील मौजे वडगाव व सुशी येथील 73 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते यावेळी ह.भ.प.दत्ता महाराज पं.स.सदस्य जयसिंग जाधव माजी पं.स.सदस्य हिम्मत खरात गटविकास अधिकारी डॉ.सचिन सानप महिला व बालविकास अधिकारी थोरात अभियंता चोपडे सरपंच बबन औटे,विष्णू आडे,विक्रम कदम,चक्रधर मोहिते आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते
जलजीवन मिशन अंतर्गत मौजे सुशी येथील ४३ लक्ष रुपये किमतीची नळ पाणीपुरवठा योजना . म ग्रा. रो .ह .यो. अंतर्गत २० लक्ष रुपये किंमतीचे ग्रामपंचायत भवन बांधकाम १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत मौजे सुशी तांडा येथे ६ लक्ष रुपये किंमतीचे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ विजयसिह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी ह.भ.प. दत्ता महाराज यांनी आशिर्वाद दिले या कार्यक्रमाला अलिम पठाण अजित काळे,विनोद पवार,वचिष्ट काळे,धोडीराम चव्हाण,उतम तुरुकमारे,मुक्ताराम मोढे,चंद्रकांत पौळ,तिर्थराज पौळ,भारत झरे,सर्जेराव मोढे,धनशाम परताडे,बाजीराव तुरुकमारे,नंदू लोढे,यांच्यासह सुशी व वडगाव येथील ग्रामस्थ व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.